अजित पवारांचे थोरातांना जशास तसे प्रत्युत्तर, पुणे लोकसभा आमचीच; तर पुणे लोकसभेवर काँग्रेसचाच हक्क असा वडेट्टीवारांचा दावा

महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत वार-पलटवार


पुणे : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा आणि लहान भाऊ कोण याबाबत जोरदार चर्चा रंगल्या असतानाच आता येऊ घातलेल्या पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी एक वक्तव्य केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही अजित पवार यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.

बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील जागा वाटपावर भाष्य केले. पुणे लोकसभेची निवडणूक काँग्रेसच लढवेल, या थोरातांच्या वक्तव्यावर पुणे लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढवेल, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.

आज पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, पुणे लोकसभेची निवडणूक कोणत्या पक्षाने लढवायची, याचा अंतिम निर्णय महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते चर्चा करून घेतील. मात्र, पुण्यात राष्ट्रवादीची ताकद अधिक असल्याने ही जागा राष्ट्रवादीने लढवावी, अशी आमची इच्छा आहे. बाळासाहेब थोरात म्हणत असतील ही जागा काँग्रेस लढवेल. तर, मीही ठामपणे सांगतो की, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढवेल. पुण्यात राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे, असं म्हणत पवारांनी काँग्रेसच्या वर्मावर बोट ठेवले आहे.

महाविकास आघाडीच्या जागांचे वाटप करताना पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली गेली पाहिजे, असे मत अजित पवारांनी व्यक्त केले आहे. सद्यस्थितीनुसार पुण्यात राष्ट्रवादीचेच आमदार-खासदार अधिक आहेत. काँग्रेसकडे याआधीपासून ही जागा होती मात्र मात्र ती काँग्रेसला जिंकता आली नाही. अजित पवार म्हणाले, एखाद्या मतदारसंघात एखाद्या पक्षाची जागा निवडून येण्याची शक्यता कमी असेल आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षाची ताकद तिथे जास्त असेल तर ती जागा मित्र पक्षाला दिली गेली पाहिजे. दुसरीकडे जर अशी उलट परिस्थिती असेल, तेव्हाही असे घडलं पाहिजे. जागांची अदलाबदलही करायला हवी.

पुणे लोकसभेवर काॅंग्रेसचाच हक्क - वडेट्टीवार


दरम्यान काॅंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीदेखील अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. "खरं तर पुणे लोकसभेच्या जागेवर काॅंग्रेसचाच हक्क आहे. कसबा ही जागादेखील आम्ही किती वर्षांनी जिंकली? काॅंग्रेसची ताकद वाढली आहे असं मी म्हणत नाही. पण महाविकास आघाडी म्हणून लढायचं असेल तर आघाडीचा धर्म म्हणून आहे त्या जागेवर वाद घालण्यापेक्षा पुण्याची जागा काॅंग्रेसकडे होती, ती काॅंग्रेसकडे राहावी आणि काॅंग्रेसने लढावी असं मोठं मन सर्वांनी करुन सहकार्य करण्याची अपेक्षा आहे", असं ते म्हणाले.

या वार पलटवारांमुळे आता पुण्याची जागा महाविकास आघाडीतल्या नेमकी कोणत्या पक्षाला मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Comments
Add Comment

Virar crime news : सवतीचा राग अनावर! नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोवर चाकू अन् त्रिशूळने प्राणघातक हल्ला; विरारमधील धक्कादायक घटना

विरार : पतीच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच संतापाच्या भरात एका महिलेने तिच्या सवतीवर चाकू आणि त्रिशूळने

Dhule : मनमाड–इंदूर रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, संयुक्त मोजणीचे पथक माघारी

Dhule : मनमाड–इंदूर रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित भूसंपादनाच्या संयुक्त मोजणीला अवधान परिसरातील शेतकऱ्यांनी

Ramabai Ranvir : लेकींच्या शिक्षणासाठी ४७ वर्षीय आईची अनोखी जिद्द; चप्पल तुटली, अनवाणी धावली अन् ३ किमीची शर्यत जिंकली!

पुणे : मुलांच्या भविष्यासाठी आई कोणत्याही संकटाला सामोरं जाण्यास तयार असते, याचं प्रेरणादायी उदाहरण पुण्यात

Jalgaon : चाळीसगावमध्ये भीषण अपघात ! भरधाव कारने तीन महिलांना उडवले, एकीचा जागीच मृत्यू

Jalgaon Accident News : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर बिलाखेड

Sangli crime news : तोंडातून पांढरा फेस अन् उग्र वास; कौटुंबिक वादातून पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू; सांगलीत खळबळ

सांगली : सांगली जिल्ह्यातील पलूस शहरातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. घरगुती वादाच्या कारणावरून एका

Jalgaon Crime : धावत्या रेल्वेत दिवा लावून पूजा, प्रवाशावर रेल्वेची कारवाई

Jalgaon Crime : धावत्या रेल्वेच्या डब्यात दिवा लावून धार्मिक विधी करणाऱ्या प्रवाशाविरुद्ध मध्य रेल्वेने कारवाई केली