Thursday, August 14, 2025

मुंबईतल्या तब्बल 'इतक्या' इमारती धोकादायक

मुंबईतल्या तब्बल 'इतक्या' इमारती धोकादायक

मुंबई : एकीकडे मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राज्य सरकार राबवीत आहे, तर दुस-या बाजूला बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईमधल्या धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. या धोक्याच्या सूचनेमुळे या इमारतींमध्ये राहणा-या नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे.


मुंबई महापालिका क्षेत्रातील सी-१ श्रेणीतल्या अतिधोकादायक आणि मोडकळीला आलेल्या तब्बल २२६ इमारतींची यादी महापालिकेने जाहीर केली आहे. ही यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या २२६ इमारतींपैकी मुंबई शहर विभागात ३५, पूर्व उपनगर विभागात ६५, तर पश्चिम उपनगर विभागात १२६ इमारती समाविष्ट आहेत.


धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींमध्ये राहत असलेल्या नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून त्वरित सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं, असं आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आशिष शर्मा यांनी प्रशासनाच्या वतीने केलं आहे.


Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >