Sunday, October 19, 2025
Happy Diwali

वायुदलात २७६ पदांची भरती होणार

वायुदलात २७६ पदांची भरती होणार

नवी दिल्ली : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि देशसेवेचे स्वप्न असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय हवाई दलाने २७६ पदांची भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट II (AFCAT) २०२३च्या भरतीसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया १ जूनपासून सुरू होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते वायू दलाची अधिकृत वेबसाईट afcat.cdac.in वर जाऊ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. १ जूनपासून २०२३ अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर ३० जून २०२३ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. ऑनलाइन अर्ज १ जूनपासून अधिकृत वेबसाइट afcat.cdac.in वर उपलब्ध होईल.

Comments
Add Comment