Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

नायर दंत रुग्णालय कर्मचाऱ्यांचे १ जूनपासून सामूहिक रजा आंदोलन

नायर दंत रुग्णालय कर्मचाऱ्यांचे १ जूनपासून सामूहिक रजा आंदोलन

मुंबई : चतुर्थ श्रेणी कामगारांची ४० टक्के रिक्त पदे, रिक्त पदांमुळे अन्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण, कंत्राटी कामगारांना भलत्याच कामास जुंपणे यामुळे नायर दंत रुग्णालयातील कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात असून रुग्णालय प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ जूनपासून सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा दिल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहायक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेच्या नायर दंत रुग्णालयात चतुर्थ श्रेणीच्या १३९ पदे असून यापैकी ७९ पदे भरण्यात आली आहेत. सफाई कामगार, सेवक, हमाल, कक्ष परिचारक, विद्युत विभागातील अन्य कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. १३९ पैकी अवघे ७९ पदे भरण्यात आल्याने उर्वरित कामगारांवर कामाचा प्रचंड ताण पडतो. नायर दंत रुग्णालय प्रशासनाने नुकतीच प्रशासकीय पदे भरली, मात्र चतुर्थ श्रेणीतील पदे अद्याप भरलेली नाहीत. यासाठी २४ एप्रिल ते २ मे आंदोलनही केले. तेव्हा कामगार संघटना व रुग्णालय प्रशासनात बैठकही होऊन चतुर्थ श्रेणीतील पदे भरण्याचे रुग्णालय प्रशासनाने मान्य केले होते, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment