Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

आदित्य ठाकरेंना मोठा धक्का!

आदित्य ठाकरेंना मोठा धक्का!

राहुल कनाल यांचा उबाठा युवा सेनेच्या कोअर टीमला रामराम

मुंबई: आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उबाठा युवा सेनेत आता मोठ्या प्रमाणावर गळतीला सुरूवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी उबाठा युवा सेनेतील प्रमुख पदाधिकारी आणि माजी नगरसेवक अमेय घोले यांनी पक्षाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता राहुल कनाल यांनी उबाठा युवा सेनेचा कोअर ग्रुप सोडल्याने खळबळ उडाली आहे. तेही शिंदे गटात प्रवेश करण्याच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हा आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का समजला जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी उबाठा गट सोडल्यानंतर अगदी आजही नाराजीचा सूर कमी होताना दिसत नाही. एकेकाळी आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावणारे युवा सैनिकही नाराज दिसत आहेत. त्यातीलच एक खंदा सैनिक असलेल्या राहुल कनाल यांनी उबाठा युवा सेनेच्या कोअर टीमच्या व्हॅाट्स अप ग्रुप सोडल्याने चर्चा सुरू झाली आहे. राहुल कनाल हे आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तींयांपैकी एक मानले जातात.

कनाल नाराज का?

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले राहुल कनाल नाराज का झालेत याचीच चर्चा जोरदार सुरू आहे. राहुल कनाल हे आदित्य ठाकरेंसाठी काम करतात. पण सध्या आदित्य राज्याच्या राजकारणात व्यस्त आहे. त्यामुळे इतर युवा सेनेचे पदाधिकारी पक्षात ढवळाढवळ करत असल्याचं कनाल यांना पटत नसल्याचं समजत आहे. याच कारणावरून राहुल कनाल यांनी ग्रुप सोडला असल्याची माहिती आहे.

Comments
Add Comment