सर्वाधिक एंगेजमेंट असलेल्या यादीत दुसऱ्या स्थानी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील आरसीबीचा प्रवास थांबलेला असला तरी त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे, हे समोर आले आहे. सोशल मीडियावर एंगेजमेंट डेटा नुकताच समोर आला आहे. यात जगभरातील क्रीडा संघांमध्ये आरसीबी दुसऱ्या स्थानी आहे.
सोशल मीडियावर सर्वाधिक एंगेजमेंट असलेल्या (एप्रिल २०२३) जगभरातील क्रीडा संघांच्या यादीत रेआल माद्रिद पहिल्या स्थानी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु दुसऱ्या, तर चेन्नई सुपर किंग्जचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. जगभरातील दोन कंपन्यांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. आशियामध्ये पाहिले तर आरसीबी या बाबतीत नंबर १ क्रीडा संघ आहे. यावरून विराट कोहली आणि या संघाचा चाहतावर्ग किती मजबूत आहे हे दिसून येते.