हवामान विभागाचा दुसरा अंदाज जाहीर
पुणे : भारतीय हवामान विभागाचा मान्सून संदर्भातला दुसरा अंदाज जाहीर झाला आहे. यानुसार भारतात जून ते सप्टेंबर दरम्यान मान्सून सरासरी ९६ टक्के होणार आहे. यामध्ये देशात जून महिन्यात मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. देशात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याचा अंदाज आहे.
25 May 2023, The extended range forecast for coming 4 weeks for all India rainfall by IMD. pic.twitter.com/505KP0sGa2
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 25, 2023
मराठवाडा, विदर्भ जून महिन्यात कमी पाऊस तर संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक तापमानाची शक्यता आहे. दीर्घ काळासाठी म्हणजे जून-सप्टेंबर महिन्यात दिलेल्या अंदाजात महाराष्ट्रात मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
अल निनोसाठी अनुकूल वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे. मान्सूनमध्ये अल निनोचा प्रभाव बघायला मिळण्याची दाट शक्यता असल्याचे देखील भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.