अलिबागला पोहोचायला लागणार चार तास!

मुंबई : पावसाळा, उन्हाळा अगदी कोणत्याही ऋतूत पर्यटक अलिबागला जाणं नेहमीच पसंत करतात. समुद्रमार्गे बोटीने येताना प्रवाशांना लाटांचा आनंद घेत प्रवास करता येतो. पर्यटक जलवाहतूकीद्वारेच अलिबाग गाठत असतात. त्यामुळे सर्वच प्रवाशांना जलवाहतूक फायदेशीर ठरत असते. सोबतच एका तासात पोहोचता येत असल्यामुळे वेळेचीही बचत होते. मात्र आता याच प्रवासासाठी चार तास मोजावे लागणार आहेत.


याचं कारण म्हणजे पावसाळा तोंडावर आला असताना वेळेची बचत करणारा मांडवा ते गेट वे हा जलवाहतूक प्रवास आता तीन महिन्यांसाठी बंद राहणार आहे. २६ मे ते ३१ ऑगस्टदरम्यान प्रवासी जलवाहतूक बंद राहणार असून, महाराष्ट्र सागरी मंडळ विभागाने जलवाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्यांना पत्र देऊन वाहतूक बंद करण्याचे कळविले आहे. त्यामुळे मुंबईला जाण्या-येण्यासाठी आता रस्ते मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. जलवाहतूकीद्वारे मुंबई गाठण्यासाठी एका तासात होणा-या प्रवासाला रस्तेमार्गामुळे चार तासाचा अवधी लागणार आहे.


मांडवा ते गेटवे समुद्री ब्लॉक असला तरी मांडवा ते भाऊचा धक्का रो रो बोट सेवा सुरू राहणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असली तरी काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मात्र, हवामानानुसार रो रोच्या फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता तीन महिने रस्ते मार्गानेच ये-जा करावी लागणार आहे.

Comments
Add Comment

The Koyna Dam : कोयना धरण 'छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' नावाने ओळखले जाणार

मुंबई : पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचे नामांतर "छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर" असे

Chandrashekar Bawankule : मुंबई आणि पुण्यातील २०११ पूर्वीच्या अतिक्रमणधारकांना मिळणार हक्काचे घर

वगळलेल्या भागातील बांधकामांचे सर्वेक्षण होणार; कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन मुंबई :

Junk Food Ban : शाळांच्या परिसरात हाय फॅट, हाय सॉल्ट आणि साखरयुक्त पदार्थांचा समावेश असलेल्या जंक फूडच्या विक्रीवर बंदी; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

मुंबई : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी आणि त्यांना लहान वयातच लठ्ठपणा तसेच विविध

Sunetra Pawar : मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आणि अजित पवारांच्या जयंतीदिनी ९५ हजार नागरिकांनी आरोग्यसेवांचा लाभ घेतला

'महा आरोग्य शिबिराला' राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद; ८ हजार ९४० नागरिकांनी रक्तदान केले मुंबई : मुख्यमंत्री

Urban Development Department : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विकासकामांवर आता एआय आणि 'जीओ टॅगिंगची' नजर - नगरविकास विभागाचा निर्णय

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ अधिवेशनात केलेल्या घोषणेची

Pratap Sarnaik : NCMC स्मार्ट कार्डसाठी आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय मुंबई : एसटी प्रवासात