Wednesday, April 30, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमीनाशिक

आत्ता शिर्डी ते करवीर जा सुस्साट, लोकार्पण संपन्न

आत्ता शिर्डी ते करवीर जा सुस्साट, लोकार्पण संपन्न

नाशिक: समृद्धी महामार्गाच्या प्रतिक्षित शिर्डी ते भरवीर या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी दोघांनीही कोनाशिलेचे अनावरण केले. त्यानंतर येथे उभारलेल्या व्यासपीठावर दीपप्रज्वलन केले. या महामार्गामुळे नाशिक ते शिर्डी हे अंतर जलदरित्या कापता येणे शक्य होणार आहे.

समृद्धी महामार्गावर ७ मोठे पूल, १८ छोटे पूल, वाहनांसाठी ३० भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी २३ भुयारी मार्ग, ३ पथकर प्लाझावरील तीन इंटरचेंज, ५६ टोल बूथ, ६ वे ब्रिज आदी सुविधा आहेत. पॅकेज क्र ११, १२ आणि १३ चे इगतपुरी तालुक्यामधील भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचा खर्च ३ हजार २०० कोटी रुपये एवढा असून लांबी ८० किमी आहे. या टप्याच्या उद्‌घाटनानंतर ७०१ किमी पैकी आता एकूण ६०० किमी लांबीचा समृध्दी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

Comments
Add Comment