कंपनी एकत्रीकरण आणि विभाजन

Share
  • उदय पिंगळे, मुंबई ग्राहक पंचायत

शेअरबाजारात नोंदण्यात आलेल्या कंपन्यांच्या बाबतीत आपण एकत्रीकरण आणि विभाजन (Merger and Demerger) हे शब्दप्रयोग नेहमी ऐकतो. एचडीएफसी लिमिटेड ही कंपनी एचडीएफसी बँकमध्ये लवकरच विलीन होणार आहे. एचडीएफसीच्या शेअरधारकांचे शेअर रद्द होऊन त्यांच्याकडे असलेल्या २५ शेअर्सच्या बदल्यात एचडीएफसी बँकेचे ४२ शेअर्स मिळतील. यासाठी आवश्यक कारवाई जून २०२३ अखेर पूर्ण होईल. अलीकडेच बीईएमएल या कंपनीकडे असलेली बंगलोर आणि मैसूर येथे असलेली स्थावर मालमत्ता वेगळ्या कंपनीकडे हस्तांतरित झाली. शेअर होल्डरना त्याच्या बीईएमएल कंपनीच्या संख्येएवढेच नवीन कंपनीचे शेअर्स मिळून त्याचे शेअरबाजारात खरेदी-विक्री व्यवहर चालू झाले आहेत. या दोन्ही तशा सर्वसाधारण घटना असून यापूर्वी आणि नंतरही अशा घटना घडतील. याविषयी थोडी अधिक माहिती जाणून घेऊयात.

कंपनी कायद्यात विलिनीकरण अथवा विभाजन याचा स्पष्ट उल्लेख नाही, तर त्यातील खंड पाच विभाग सहामध्ये ३९० ते ३९६ ए मध्ये तडजोड, व्यवस्था आणि पुनर्बांधणी यासंबंधी तरतुदी आहेत. त्यामुळे सोप्या भाषेत एकत्रीकरण अथवा विलिनीकरण ही एक कायदेशीर तडजोड असून त्याद्वारे दोन किंवा अधिक कंपन्या एकत्रित येऊन वेगळी कंपनी स्थापन होईल किंवा एक किंवा अधिक कंपन्या अन्य कंपनीचा एखादा विभाग आपल्यात सामावून घेतील. विलीन झालेल्या कंपनी अथवा विभागाचे अस्तीत्व राहणार नाही तर ते नवीन कंपनीचे भागधारक बनतील, तर विभाजन झाल्यास दोन वा अधिक कंपन्यांचे प्रमाणशीर भागधारक बनतील. एकत्रीकरण आणि विभाजन या परस्परविरोधी क्रिया आहेत. यातील विभाजन होण्याचे मुख्य कारण कंपनीची पुनर्बांधणी किंवा कौटुंबिक व्यवसायाची वारसात विभागणी करण्याची गरज ही कारणे असू शकतात.

व्यवसायाचा जमाखर्च आणि आर्थिक अहवाल तयार करण्याच्या मान्य पद्धतीनुसार मालमत्ता आणि देणी, प्राप्ती आणि खर्च, रोखता प्रवाह म्हणजेच पैशांची आवकजावक, गुंतवणूक यांची मोजणी एका विशिष्ट पद्धतीनेच करावी लागते. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ मध्ये यासंबंधी विविध तरतुदी आहेत, त्या पाळाव्या लागतात. यातील १४व्या तरतुदीनुसार एकत्रीकरण २ प्रकारचे आहे. यातील पहिल्या प्रकारात एक कंपनी दुसऱ्या कंपनीत विलीन होते, तर दुसऱ्या प्रकारात एका कंपनीची अथवा विभागाची खरेदी (अधिग्रहण) दुसरी कंपनी करते. जेव्हा एक कंपनी दुसऱ्या कंपनीत विलीन होईल, तेव्हा खालील गोष्टींची पूर्तता करावी लागते.

  • एक कंपनी दुसऱ्या कंपनीत विलीन झाली, तर तिची मालमत्ता आणि देणीही विलीन झालेल्या कंपनीत मिळवली जातील.
  • विलीन झालेल्या कंपनीचे भागधारक हे विलिनीकरण झालेल्या कंपनीचे विशिष्ट मान्य पद्धतीने आपोआपच भागधारक होतील.
  • विलिनीकरण प्रक्रियेत एक शेअरपेक्षा कमी शेअर द्यावा लागत असल्यास त्याची भरपाई पैशात
    केली जाईल.
  • विलीन झालेल्या कंपनीचा व्यवसाय हा विलिनीकरण झालेल्या कंपनीचा व्यवसाय असेल.
  • कंपनीचे मूल्यांकन करताना मालमत्ता आणि देणी यात कोणताही फेरफार केला जाणार नाही. एकाच पद्धतीने दोन्ही कंपन्यांच्या मालमत्तेची मोजणी करण्यात येईल. जेव्हा विलिनीकरण अधिग्रहण करण्यामुळे होईल तेव्हाही मूल्यांकन वरील पद्धतीनेच होईल. फक्त यातील एक दोन गोष्टी कदाचित वगळाव्या लागतील. आयकर कायद्यानुसार विलिनीकरण हे एक अथवा अधिक कंपन्या विलीन होऊन एक किंवा अधिक नवीन कंपन्या निर्माण होऊन त्यामुळे –
  • विलीन झालेल्या कंपनीची मालमत्ता ही विलिनीकरण झालेल्या कंपनीची मालमत्ता होईल.
  • विलीन झालेल्या कंपनीची देणी ही विलिनीकरण झालेल्या कंपनीची देणी होतील.
  • विलीन झालेल्या कंपनीचे भागधारक हे विलिनीकरण झालेल्या कंपनीचे मान्य पद्धतीने आपोआपच भागधारक होतील. आयकर कायद्यानुसार कंपनी विभाजन ही कंपनी कायद्यातील पुनर्रचना योजना असून विभाजित झालेल्या एक वा अधिक कंपनीत विभाजित होईल त्याप्रमाणे –
  • विभाजित कंपनीकडे विभाजन होण्यापूर्वी असलेली सर्व मालमत्ता हस्तांतरित होईल.
  • विभाजित कंपनीकडे विभाजन होण्यापूर्वीची सर्व देणी हस्तांतरित होतील.
  • मालमत्ता आणि देणी याचे मूल्यांकन विभाजित होण्यापूर्वी हिशोबात जे धरले, तेच धरण्यात येईल.
  • विभाजित झालेल्या कंपनीचे समभाग पूर्वीच्या भागधारकांना प्रमाणशीर पद्धतीने मिळतील.
  • विभाजित एक अथवा अनेक कंपन्या निर्माण होऊन जर मूळ कंपनी तशीच राहणार असेल, तर त्यास व्यावसायिक विभागणी पुनर्रचना समजली जाईल, तर मूळ कंपनी अस्तित्वात राहणार नसल्यास कंपनी बंद न करता झालेली विभागणी समजण्यात येईल.

mgpshikshan@gmail.com

Recent Posts

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

1 hour ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

2 hours ago

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

2 hours ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

4 hours ago