जळगावातील हृदयाला चटका लावणारी घटना
जळगाव: गुरुवारी-बारावीच्या निकालानंतर जळगावात हृदयाला चटका लावणारी घटना घडली आहे. १२ वीत शाळेतून पहिला क्रमांक पटकावलेल्या लेकावर वडिलांच्या मृत्यूने दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दुपारी १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला होता. त्यात मृत आनंदा जगताप यांच्या मुलाने शाळेत पहिला क्रमांक पटकावला. मुलाचा आनंद साजरा करण्यासाठी आनंदा घरी जात होते. पण वाटेतच काळाने घात केला. मुलगा बारावी पास झाला यासाठी कुटुंबात उत्साह होता. परंतु घरातील कर्ता पुरुष अपघातात गेल्याची बातमी कळताच कुटुंबाला धक्का बसला. या बातमीने गावकरीही हळहळले. सध्या पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून अपघात नेमका कशामुळे झाला याचा पोलीस तपास करत आहेत.