Saturday, October 25, 2025
Happy Diwali

उबाठा गटाचा खासदार वर्षा बंगल्यावर बैठकीला

उबाठा गटाचा खासदार वर्षा बंगल्यावर बैठकीला

येत्या काही दिवसांत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

मुंबई: येणाऱ्या काळात उबाठा गटातील खासदार, आमदार शिवसेनेत प्रवेश केलेले दिसतील. कालसुद्धा बैठकीवेळी एक खासदार उपस्थित होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेनेच्या एका खासदाराने केला आहे. या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात तो खासदार कोण? अशी चर्चा रंगली आहे.

शिंदेचे निकटवर्तीय असलेले खासदार कृपाल तुमाने यांनी हा मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, ते खासदार बैठकीत नव्हते पण बाहेर बसले होते. ते देखील येतील. तसेच जे काही खासदार उरलेत त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त काढायचा आहे. खासदार, आमदार, पदाधिकारी सर्वांची प्रवेशाची इच्छा आहे, ते लवकरच येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचाही समावेश आहे. त्यासाठीच ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेनेचे खासदार वर्षा बंगल्यावर उपस्थित होते. या बैठकीत खासदारांच्या कामाचा आढावा तसेच मतदारसंघातील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. यानंतर खासदार कृपाल तुमाने यांनी ही माहिती दिली.

Comments
Add Comment