Monday, July 1, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखसौ. निलमताई राणे ‘प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व’

सौ. निलमताई राणे ‘प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व’

  • अनघा निकम-मगदूम

असं म्हणतात, स्त्रीकडे अनेक गुण असतात, पण त्याला सुद्धा कोंदण लागतं. राणे साहेबांनी निलमताई यांच्या या गुणांना नेहमीच संधी देत व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीवर केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगमंत्री नारायणराव राणे साहेबांची मुलाखत होती. त्यावेळी माजी खासदार निलेशजी राणे आणि आ. नितेशजी राणे हेही उपस्थित होते. यावेळी राणे साहेबांनी सांगितलेली एक गोष्ट खूप महत्त्वाची होती, ‘माझं कुटुंब माझ्या पत्नीने बांधून ठेवले आहे.’ त्यांच्या याच शब्दातून सौ. निलमताई राणे यांच्याबद्दलचं त्यांना असणारं प्रेम, आदर आणि कौतुक दिसत होतं.

केवळ राजकारणातच नव्हे तर समाजकारण, उद्योग व्यवसायात आज राणे कुटुंबाचे मोठे नाव आहे. सिंधुदुर्गातील एका छोट्या गावातून सुरू झालेला राणे साहेबांचा प्रवास दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. यामध्ये आपल्या कुटुंबाचा मोठा सहभाग आहे. हे सांगताना राणे साहेबांनी एकत्रित कुटुंबाची ताकद आणि त्याच्यामागे असलेल्या सौ. निलमताई राणे यांचे योगदान याचं केलेलं जाहीर कौतुक हे आजच्या काळात खूप महत्त्वाचं आहे.

सौ. निलमताई राणे यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वाकडे पाहिले तरी गजबजलेल्या वातावरणात मंद तेवणाऱ्या, आपल्या असण्याने वातावरण मंगल करणाऱ्या शांत, पवित्र समईची आठवण होते. घराबाहेर असंख्य वादळ असताना, संकटं असताना घराचं पावित्र्य, एकोपा, प्रेम, वात्सल्य जपून ठेवणं ही गोष्टच किती कठीण आहे. पण सौ. निलमताई यांनी ती गेली अनेक वर्षे केली आहे, करत आहेत. सौ. निलमताई यांचा हा स्वभाव ओळखण्यासाठी फार काळ त्यांच्यासोबत, सहवासात राहण्याची आवश्यकता नसते, एकदा तुम्ही त्यांच्या सहवासात आला की, त्यांचा आपलेपणा, आपुलकी, प्रेमळ स्वभाव लगेचच जाणवू लागतो. प्रत्येकाला सांभाळून घेण्याचे त्यांचे हे कसब आजच्या काळात किती महत्त्वाचे आहे हे जाणवते.

निलमताई यांचा एक पत्नी, गृहिणी, एक आई ते एक कुशल उद्योगिनी हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. राणेसाहेब आणि निलमताई दोघांनीही शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. राणे साहेब घराबाहेर संघर्षाचा सामना करत, विरोधावर प्रहार करत लढत होते, त्याचवेळी निलमताई यांनी घरात, कुटुंबात निर्माण केलेले घट्ट बंध किती मजबूत आहेत याची प्रचिती वारंवार येतं राहाते. कुटुंबाची मोठी ताकद पाठीशी असेल, तर जग सुद्धा जिंकता येतं, हे राणे कुटुंबाकडे पाहिल्यावर समजून येतं.

या परिवाराने संघर्षाचे, संकटाचे, परीक्षेचे अनेक प्रसंग पाहिले, राजकारणात राहून टोकाचा विरोध आणि विरोधक पाहिले, पण त्या सगळ्यांवर मात करत आज राणे कुटुंब भक्कमपणे महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात घट्ट पाय रोवून उभे आहे. त्याचं श्रेय स्वतः राणे साहेबांनीच सौ. नीलमताईंना दिले आहे. असं म्हणतात, स्त्रीकडे अनेक गुण असतात, पण त्याला सुद्धा कोंदण लागतं. राणे साहेबांनी निलमताई यांच्या या गुणांना नेहमीच संधी देत व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे आणि घरातली जबाबदारी सांभाळत निलमताई यांनीही उद्योगिनी म्हणून यश प्राप्त केले आहे. एकीकडे राणे साहेबांची पत्नी, दोन कर्तृत्ववान मुलांची आई, नातवंडांची प्रेमळ आज्जी या सोबतच सौ. निलमताई राणे ही एक स्वतंत्र ओळख आहे. महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे असो किंवा सामान्य लोकांसाठी रुग्णसेवा उपलब्ध करून देणे असो, अशा प्रत्येक सामाजिक उपक्रमात त्या आवर्जून सहभागी असतात. सौ. निलमताई यांच्या स्वभावातला साधेपणा, कुणाशीही थेट जोडला जाणारा त्यांच्यातला सहजपणा ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्य आहेत.

आज त्यांचा वाढदिवस, यानिमित्ताने सौ. निलमताई यांना मनःपूर्वक शुभेच्छा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -