Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीसंसद भवनाच्या उद्घाटनाचे आमंत्रण १७ पक्षांनी स्वीकारले

संसद भवनाच्या उद्घाटनाचे आमंत्रण १७ पक्षांनी स्वीकारले

नवी दिल्ली : देशाला नवीन संसद भवन मिळणार आहे. येत्या २८ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. मात्र, मोदी यांनी उद्घाटन करण्यावरुन काँग्रेससह १९ पक्षांनी आक्षेप घेतला असून या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. तर जवळपास १७ पक्षांनी मोदी सरकारचे आमंत्रण स्वीकारले आहे.

काँग्रेससह १९ पक्षांचे म्हणणे आहे की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डावलून पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाचा निर्णय म्हणजे लोकतंत्रावर सरळ हल्ला आहे. बुधवारी विरोध पक्षांनी एक संयुक्त निवेदनही प्रसिद्ध केले.

दरम्यान, मोदी सरकारने दिलेले उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण १७ पक्षांनी स्वीकारले आहे. यामध्ये भाजपा, शिवसेना (शिंदे गट), शिरोमणी अकाली दल, एनपीपी, एनडीपीपी, एसकेएम, जेजेपी, आरएलजेपी, आरपीआय (आठवले गट), अपना दल (एस), तमिळ मनीला काँग्रेस, एआयएडीएके, बीजेडी, तेलुगु देसम पार्टी, वायएसआर काँग्रेस, आयएमकेएमके आणि एजेएसयू एमएनएफ या पक्षांचा समावेश आहे.

तर या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणाऱ्या पक्षांमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डीएमके, आम आदमी पार्टी, शिवसेना (उबाठा), समाजवादी पार्टी, सीपीआय, जेएमएम, केरळ काँग्रेस (मणि), वीसीके, रालोद, राष्ट्रवादी काँग्रेस, जेडीयू, सीपीआय (एम), आययूएमएल, नॅशनल कॉन्फ्रेंस, आरएसपी, एआयएमआयएम आणि एमडीएमके या पक्षांचा सहभाग आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -