...तर तेल आणि शस्त्रास्त्र करार रद्द करू

  483

रशियाची भारताला मोठी धमकी


मास्को : युक्रेनसोबतच्या युद्धामुळे जगापासून एकाकी पडलेला रशिया भारतावर (एफएटीएफ ) फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्समध्ये सहकार्य करण्यासाठी दबाव आणत आहे. तेथील स्थानिक वृत्तानुसार, जर भारताने रशियाला एफएटीएफच्या 'ब्लॅक लिस्ट' किंवा 'ग्रे लिस्ट'मध्ये समाविष्ट होण्यापासून वाचवले नाही, तर ते भारतासोबतचे संरक्षण आणि ऊर्जा करार रशिया संपुष्टात आणेल. यामुळे भारताची चिंता देखील वाढली आहे.


एफएटीएफ ही एक आंतरराष्ट्रीय संस्था जी आर्थिक गुन्हे रोखण्याचा प्रयत्न करते. एफएटीएफच्या काळ्या किंवा ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या देशावर देखरेख वाढवली जाते आणि दिलेली आर्थिक मदत देखील थांबवली जाते. रशिया या परिस्थितीचा सामना करण्याची शक्यता आहे. त्यामुळे रशिया आता भारताकडे मदत मागत आहे. रशिया भारतासोबत अनेक देशांना एफएटीएफ यादीतून वाचवण्यासाठी दबाव आणत आहे. युक्रेनसोबतच्या युद्धामुळे एफएटीएफ जूनमध्ये रशियाचा 'ब्लॅक लिस्ट' किंवा 'ग्रे लिस्ट'मध्ये समावेश करू शकते, अशी चर्चा आहे. यासाठी रशियाने भारताला संरक्षण आणि ऊर्जा करार संपवण्याची धमकी दिल्याचे सांगण्यात येते.


एफएटीएफ फेब्रुवारी २०२३ मध्ये रशियाची सदस्यता रद्द केली होती. रशियाची युक्रेनमध्ये सुरू असलेली लष्करी कारवाई एफएटीएफच्या मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. एफएटीएफ रशियाचे सदस्यत्व रद्द केल्यापासून रशियाचा ब्लॅक लिस्ट किंवा ग्रे लिस्टमध्ये समावेश करण्याचा आग्रह धरत आहे. असे झाल्यास याचे ऊर्जा, संरक्षण आणि वाहतूक क्षेत्रावर अतिशय गंभीर परिणाम होतील, अशी धमकी रशियाने दिली आहे. एफएटीएफच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी रशियाने भारतावर दबाव आणला आहे. रशियालाही ग्रे लिस्टमध्ये टाकले तर ते भारतासाठी अडचणीचे कारण ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

Nimisha Priya Case: भारतीय नर्स निमिषा प्रियाला येमेनमध्ये दिली जाणार फाशी? नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या

कोण आहे निमिषा प्रिया? येमेन:  केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली निमिषा प्रिया

एलॉन मस्क यांच्या 'अमेरिका पार्टी'च्या खजिन्याची चावी भारतीयाच्या हातात!

वॉशिंग्टन डीसी: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलॉन मस्क यांनी अमेरिकेत नवीन राजकीय पक्ष

युक्रेनमध्ये रशियन हल्ल्यात ११ जणांचा मृत्यू तर ८० हून अधिक जखमी, रशियन मंत्र्याचाही मृत्यू

कीव : रशियाने युक्रेनवर पुन्हा एकदा मोठा हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये किमान ११ लोकांचा मृत्यू झाला, तर ८० हून

अमेरिकेतील टेक्सासमधील महापुरात १०० हुन अधिक लोकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

वॉशिंग्टन : अमेरिकेतील टेक्सासमध्ये मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरात आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा

Trump Tarrif : ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब, १४ देशांवर लादला ४० टक्क्यांपर्यंत टॅक्स

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी ८ जुलैला १४ देशांवरील नव्या आयात शुल्क(टॅरिफ)ची

Donald Trump: ट्रम्प यांचा जपान, दक्षिण कोरियावर टॅरिफ बॉम्ब, लावला २५ टक्के टॅक्स

वॉशिंग्टन: सोमवारी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ७ जुलैला विविध देशांवर लागणारा टॅरिफ लेटर जारी