Monday, June 16, 2025

आमदार बच्चू यांना मंत्रिमंडळ विस्ताराआधीच मंत्रीपदाचा दर्जा...कारण?

आमदार बच्चू यांना मंत्रिमंडळ विस्ताराआधीच मंत्रीपदाचा दर्जा...कारण?

मुंबई: जनशक्ती प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना मंत्रिमंडळ विस्ताराआधीच मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यांची दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.


दिव्यांग कल्याण खात्याचे अभियान दिव्यांगांच्या दारापर्यंत पोहचवण्यासाठी बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबत बच्चू कडू म्हणाले, मोठ्या संघर्षानंतर आता देशातील पहिलं दिव्यांग मंत्रालय सुरू झाले आहे. पण, ते दिव्यांग बांधवापर्यंत गेलं पाहिजे. ही संकल्पना आमचीच होती. त्या बांधवांची मागणी काय आहे, त्यांच्या समस्या काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.


ते पुढे म्हणाले, आता हे मंत्रालय आम्ही प्रत्येक जिल्ह्यात घेऊन जाणार आहोत. फक्त सेवेसाठी हे अभियान असणार आहे. महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आम्ही काम करणार आहोत. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. काही दिवसांपूर्वी मंत्रिपदासंदर्भात त्यांनी माध्यमांसमोर बोलूनही दाखवले होते. अखेर त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे.

Comments
Add Comment