
पुणे: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे वक्तव्य राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
ते म्हणाले की, आमदार, मंत्री, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मंत्रिमंडळ विस्तारावर बोलण्याचा अधिकार नाही. हे सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आहेत. दोघांनीही वेळोवेळी मंत्रिमंडळ विस्तार लवकर करू असे सांगितले आहे. त्यामुळे आम्हालाही वाटते आहे, कोर्ट केसेसच्या ज्या काही अडचणी होत्या, त्या दूर झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे वाटते.
आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला संधी मिळावी यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून अनेकांनी पाण्यात देव ठेवल्याचे समजत आहे. त्यात आमदार संजय शिरसाट यांचेही नाव आहे. त्यांनी भाजपमुळेच मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्याचे म्हटले आहे.