Friday, January 23, 2026

आशिष देशमुख ६ वर्षांसाठी काँग्रेसमधून बाहेर, पण कायमचे बाहेर पडणार?

आशिष देशमुख ६ वर्षांसाठी काँग्रेसमधून बाहेर, पण कायमचे बाहेर पडणार?

काहीच दिवसांपू्र्वी घेतली होती देवेंद्र फडणवीस यांची भेट

नागपूर : माजी आमदार आशिष देशमुख यांच्यावर निलंबनानंतर काँग्रेकडून सहा वर्षांसाठी पक्षातून निष्काषित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या शिस्तपालन समितीने देशमुख ही कारवाई केली आहे. पक्ष न नेत्यांविरोधात सातत्याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे देशमुख यांना आधीच काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते.

आशिष देशमुख यांचे वागणे हे गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. ते गेल्या काही दिवसांपासून उघडपणे पक्षविरोधी भूमिका घेत आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दरमहा एक खोका मिळतो, असा थेट आरोप त्यांनी केला होता. तसेच पक्षाचे अ.भा. संघटन महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्यावरही टीका केली होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाही ओबीसीच्या मुद्यावर माफी मागण्याचा सल्लाही त्यांनी दिला होता.

त्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील शिस्तपालन समितीने देशमुख यांना ५ मार्च रोजी कारणे दाखवा नोटीस बजावत निलंबित केले होते. यावर देशमुख यांनी सादर केलेल्या उत्तराने समितीचे समाधान झाले नाही. त्यामुळे आज देशमुख यांना काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून सहा वर्षांसाठी निष्काषित करण्यात येत असल्याचा आदेश जारी करण्यात आला.

दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी आशिष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत त्यांच्या सिव्ह्ल लाईन्स येथील बंगल्यावर जाऊन नाश्ता केला होता. त्यामुळे आता आशिष देशमुख आता पुढे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >