Tuesday, April 29, 2025

महामुंबईमनोरंजनताज्या घडामोडी

अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचा अपघातात मृत्यू

अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचा अपघातात मृत्यू

मुंबई: 'साराभाई वर्सेस साराभाई' या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये जॅस्मिनच्या भूमिकेने सर्वांना हसवणारी अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचा कार अपघातात मृत्यू झाला. शोचे निर्माते आणि दिग्दर्शक जे. डी. मजेठिया यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत हिमाचल प्रदेशमध्ये हा अपघात झाल्याचे सांगितले. तिच्या अपघाती मृत्यूच्या बातमीने मालिकाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे, वैभवी तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत कारने येत होती. अचानक वळणावर कारचे नियंत्रण सुटले आणि कार खड्ड्यात पडली, त्यात वैभवीचा मृत्यू झाला. तिच्या पतीची प्रकृती स्थिर आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती पण शोच्या निर्मात्यांनी बुधवारी याची माहिती दिली.

निर्माते जे. डी. मजेठिया यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, "आयुष्य खूप क्षणभंगूर आहे. साराभाई vs साराभाई मधील 'जॅस्मिन' म्हणून ओळखली जाणारी एक अतिशय चांगली अभिनेत्री, खास मैत्रीण वैभवी उपाध्यायचे निधन झाले. कुटुंबीय तिला उद्या सकाळी ११ वाजता मुंबईत अंत्यसंस्कारासाठी आणतील. RIP वैभवी, "

आज अभिनेता नितेश पांडे याचेही हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. तसेच दोन दिवसांपूर्वी अभिनेता आदित्य सिंह राजपूतचाही मृत्यू झाला होता.

Comments
Add Comment