पुणे : पुणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विकास टिंगरे (४९) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. धानोरी येथील पोरवाल रस्त्यावर असलेल्या त्यांच्या पतसंस्थेच्या कार्यालयात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असून या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
टिंगरे हे पुण्यातील विश्रांतवाडी परिसराचे काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष कार्यरत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरी येथील पोरवाल रोडवर असलेल्या पतसंस्थेच्या कार्यालयात टिंगरे हे नेहमीप्रमाणे मंगळवारी दुपारी पतसंस्थेत आले होते. त्यांनी दुपारी जेवण केले नव्हते. त्यामुळे तेथील कर्मचार्यांनी ऑफिसमध्ये जाऊन पाहिल्यावर टिंगरे यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना तत्काळ जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले केले. याबाबतचा पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.