नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून या निकालात पहिल्या चार स्थानावर मुलींनी बाजी मारली आहे.
इशिता किशोर ही देशात पहिली आली आहे. तर गरिमा लोहिया ही देशात दुसरी, उमा हरिथी ही देशात तिसरी आणि स्मृती मिश्रा ही देशात चौथी आली आहे.
विद्यार्थ्यांना हा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.