Wednesday, July 3, 2024
Homeताज्या घडामोडीमंदिराला धूप दाखवण्याची कोणतीही परंपरा नाही : नितेश राणे

मंदिराला धूप दाखवण्याची कोणतीही परंपरा नाही : नितेश राणे

नितेश राणेंनी केली त्र्यंबकेश्वर मंदिरात महाआरती

नाशिक : भाजप आमदार नितेश राणे यांनी आज नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत आज मंदिरात महाआरती झाली. त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवण्याच्या परंपरेवरुन वाद निर्माण झाला होता. याबद्दल पत्रकार परिषद घेत नितेश राणे यांनी आज आपली भूमिका मांडली.

त्र्यंबकेश्वर मंदिरात १३ मे रोजी घडलेल्या घटनेवरुन उलट हिंदू समाजाचीच बदनामी केली जात असल्याचं नितेश राणे म्हणाले. उरूस निघतो तेव्हा मंदिराला धूप दाखवण्याची वर्षानुवर्षांची परंपरा आहे, असा केला जाणारा दावा साफ चुकीचा आहे. अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. मंदिराला धूप दाखवण्याची अशी कोणतीही परंपरा नाही. मी मंदिराच्या विश्वस्त मंडळाशी व तज्ज्ञांशी बोललो आहे. त्यांनीही अशी कोणतीही परंपरा नसल्याचे सांगितले आहे. येथे जो काही उरुस निघतो तो मंदिराच्या बाहेरच्या परिसरात निघतो व बाहेरच्या परिसरातूनच तो उरुस जातो. तेथे ते कोणाला धूप दाखवतात, याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. मी तर म्हणेन १३ मे रोजी मंदिर बंद असताना जिहादी विचारांच्या युवकांनी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हेतू काय होता, हे हळूहळू तपासात समोर येईलच, असं नितेश राणे यावेळी म्हणाले.

मंदिरात कोणाच्या येण्यावर आमचा आक्षेप नाही. तसा आक्षेप कोणाचाही नाही. मंदिरात तुम्हाला दर्शन घ्यायचे असेल तर हिंदु बांधवांप्रमाणे तुम्हीही रांगेत यावे, दर्शनाचे जे काही सामान आहे ते खरेदी करावे, रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे व नंतर इतरांप्रमाणे निघून जावे. याला आमचा काहीच आक्षेप नाही. मात्र, १३ मे रोजी जे युवक आले, त्यांच्या हातात हिरवे झेंडे होते. हिरवे झेंडे हातात घेऊन मंदिरात जाण्याचा हट्ट ते का करीत होते? आतमध्ये जाऊन त्या युवकांना चादर चढवायची होती का?, असा सवाल नितेश राणेंनी केला.

महाविकास आघाडी सत्तेत असतानाही अशीच घटना घडली होती, असा दावाही नितेश राणेंनी केला. नितेश राणे म्हणाले, मविआ असताना युवकांनी असाच प्रयोग करून पाहिला होता. आता कर्नाटक निकालामुळे त्यांच्या डोक्यात हवा भरली आहे. मविआ असताना ते चार पावले मंदिरात गेले होते. मात्र, ते वेळीच लक्षात आल्याने त्यांना अडवले. आता त्यांची हिंमत वाढली होती. त्यामुळे पूर्ण मंदिरात जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र त्यांना वेळीच अडवण्यात आले, अन्यथा अनर्थ झाला असता, असे नितेश राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -