कराड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली काल २२ मे ला शेतकरी ऊस वाहतूकदारांचा मोर्चा कराडपासून सुरु झाला होता. आज मोर्चाचा दुसरा दिवस असून कराडजवळच्या बेलवडे हवेली येथे मुक्काम केल्यानंतर मोर्चा सातार्याच्या दिशेने निघाला आहे.
यावेळी सदाभाऊ खोत माध्यमांशी बोलताना म्हणाले, “ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, युवक यांच्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत कारण सरकार हे मायबाप सरकार असतं. आम्ही ज्या मागण्या घेऊन निघालो आहोत, त्यासाठी सरकारला स्वतःच्या तिजोरीतून काही खर्च करावा लागत नाही. परंतु शेतकरीविरोधी जे कायदे आहेत ते थोडे मागे घ्या. जे राज्य सरकारच्या हातात आहेत ते राज्य सरकारने मागे घ्यावेत व केंद्र सरकारच्या हातात असलेल्या कायद्यांना मागे घेण्यासाठी प्रस्ताव पाठवून द्यावा, अशा आमच्या साध्या व सोप्या मागण्या आहेत.”
शेतकर्यांच्या विविध प्रश्नांसाठी सदाभाऊ खोत यांनी हा मोर्चा सुरु केला आहे. वाजतगाजत हा मोर्चा निघाला असून हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे.