ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातही पंतप्रधान मोदींचा डंका
सिडनी : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना म्हणाले की, ‘मोदी इज द बॉस.’ यावेळी मोदी मोदी नावाच्या घोषणाबाजीने सभागृह दुमदुमून गेले. भारतीय पंतप्रधानांच्या स्वागताशी संबंधित कार्यक्रमांबाबत ते म्हणाले की, येथे पहिल्यांदाच एखाद्याचे इतके भव्य स्वागत करण्यात आले आहे. पीएम मोदी माझे खूप चांगले मित्र आहेत. दोन्ही देश त्यांच्या लोकशाही मूल्यांच्या आधारे संबंध अधिक दृढ करतील.
पंतप्रधान मोदींसाठी ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांचे भाषण ऐकण्यासाठी २० हजार भारतीयांनी हजेरी लावली. तसेच यावेळी ऑस्ट्रेलियाचे अर्धे मंत्रिमंडळही उपस्थित होते. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अॅंथनी अल्बनीज यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.
पंतप्रधान मोदींनी यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचे त्यांचे स्वागत केल्याबद्दल आभार मानले. त्याचबरोबर त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अॅंथनी अल्बनीज यांचेही भरभरून कौतुकही केले.
पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरात भारतीय सैनिक नैयन सी सैलानी यांच्या नावाने सैलानी अॅव्हेन्यु बनवण्यात आले आहे. त्यांना पहिल्या महायुद्धात ऑस्ट्रेलियासाठी लढताना वीरमरण आले होते. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियाचे ऐतिहासिक संबंध आहेत. त्यांचा सन्मान केल्याबद्दल मी पश्चिम ऑस्ट्रेलिया सरकारचे आभार मानतो, असे ते म्हणाले.
तसेच भारत-ऑस्ट्रेलियाचे संबंध स्पष्ट करायचे झाल्यास तीन ‘सी’ बद्दल सांगावे लागेल. ज्यामध्ये कॉमनवेल्थ, क्रिकेट आणि करी त्यानंतर भारत-ऑस्ट्रेलियाचे संबंध तीन डी वर आधारित आहेत. डेमोक्रसी, डायसव्होरा आणि दोस्ती. तर काही लोकांनी भारत-ऑस्ट्रेलियाचे संबंध तीन ई वर आधारित असल्याचे म्हटले आहे. एनर्जी, इकॉनॉमी, एज्युकेशन. मात्र यापेक्षा देखील भारत-ऑस्ट्रेलियाचे संबंध मोठे आहेत, असे मोदी म्हणाले. त्यांच्या या भाषणावेळी ऑस्ट्रेलियन नागरिकांनी देखिल टाळ्यांनी दाद दिली.