Sunday, May 18, 2025

ताज्या घडामोडीनाशिक

त्र्यंबकेश्वर मंदिरात नितेश राणेंच्या उपस्थितीत महाआरती

त्र्यंबकेश्वर मंदिरात नितेश राणेंच्या उपस्थितीत महाआरती

मंदिर परिसरात सुरक्षा कडक


नाशिक :- नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात आज भाजप आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत महाआरती होणार आहे. त्यासाठी थोड्याच वेळात नितेश राणे त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होतील. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील सुरक्षा कडक करण्यात आली आहे.


त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवण्याच्या परंपरेवरुन वाद निर्माण झाला होता. याबद्दल नितेश राणे आज आपली भूमिका मांडणार आहेत. हा वाद ज्या जागेत झाला त्या जागेचीही नितेश राणे पाहणी करणार आहेत.


या वादामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात येणार्‍या भक्तांच्या संख्येवर परिणाम झाला असून ही संख्या रोडावली आहे. हा वाद लवकरात लवकर मिटवावा, अशी स्थानिक नागरिकांची धारणा आहे. मात्र राजकीय पक्षांचे नेते येणार असल्याने वाद मिटणार की चिघळणार असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, नितेश राणे आज काय भाष्य करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment