Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीडुलकीने केला घात! विठ्ठलाचे दर्शन घेऊन ते गावाच्या वेशीवर पोहचले असतानाच झाला...

डुलकीने केला घात! विठ्ठलाचे दर्शन घेऊन ते गावाच्या वेशीवर पोहचले असतानाच झाला दुर्दैवी अपघात

३ ठार, ७ जखमी

बुलडाणा : पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेऊन परतलेल्या शेगावातील भाविकांच्या वाहनाला गावाच्या वेशीवर पोहचले असतानाच दुर्दैवी अपघात झाला.

रात्रभर गाडी चालवणा-या क्रुझर चालकाला डुलकी लागल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ आज सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला.

पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांना घेऊन परतलेली क्रुझर गाडी प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या स्वागत फलकाच्या पिलरवर धडकली. या अपघातामध्ये ३ भाविक जागीच ठार झाले तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, नागरिकांच्या मदतीने सर्व भाविकांना शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालायात दाखल केले आहे. तर, गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अकोल्यात हलवण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -