Saturday, July 6, 2024
Homeमहामुंबईउबाठा सेना मुंबई महापालिकेत ५० जागांपर्यंतही पोहोचणार नाही

उबाठा सेना मुंबई महापालिकेत ५० जागांपर्यंतही पोहोचणार नाही

आशीष शेलार यांचे भाकित

मुंबई (विशेष प्रतिनिधी): ‘गेल्या २५ वर्षांत मुंबईकरांनी उद्धवजींच्या नेतृत्त्वाला आणि त्यांच्या शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीत नाकारले. कायम घरचा रस्ता दाखवला. आमच्या समर्थनामुळे तुमचे आकडे खाली जात असतानाही तुम्ही खुर्च्या उबवत होता. कारण, हिंदुत्वासाठी आम्ही तुम्हाला समर्थन देत होतो. आता परिस्थिती बदलली आहे. आज तुमच्यासमोर भाकीत करतो की, उद्धवजींची उबाठा सेना येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ५०चा आकडाही पार करू शकणार नाही, अशी टीका मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली.

मुंबई भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कार्यकारिणी बैठक रविवारी दादर वसंत स्मृती येथे पार पडली. मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, मनोज कोटक, संजय उपाध्याय, अमित साटम, योगेश सागर, सुनील राणे, पराग अळवणी, कालिदास कोळंबकर, मनीषा चौधरी, भारती लव्हेकर, विद्या ठाकूर, राजहंस सिंह, कॅप्टन तमिळ सेल्वम, जयप्रकाश ठाकूर, चित्रा वाघ, किरीट सोमय्या, सुनील कर्जतकर, केशव उपाध्ये, प्रभाकर शिंदे, राज पुरोहित, मधू चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी शेलार यांनी समाजमाध्यमांवर व्हायरल झालेला एक व्हिडीओ दाखवला. भाजप पराभूत झाला, यश मिळाले नाही तर नंगानाच आणि त्याबरोबर समाजविदारक कृत्यांची व्हिडिओ क्लिप कशी काढली जाते? त्याचा आनंद कर्नाटकात कसा साजरा केला. भाजपच्या झेंड्यावर गाय कशी कापली हे दाखविण्यात येत आहे. गाय कापून भाजपच्या झेंड्यावर तुम्ही उन्माद साजरा करणार असाल आणि त्या काँग्रेसबरोबर उद्धवजी तुम्ही बसणार असाल तर तुमचा निषेध करावा तेवढा कमी आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींना सर्वमान्यता मुंबई शहरातील आमच्यावर टीका करणारे काहीजण म्हणायचे कधीतरी लोकांचे ऐका. सलग १५ दिवसांत ९ मोठे कार्यक्रम अन्य कुठल्या पक्षाला जमू शकत नाहीत तेवढे आपण केले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वाला सर्वमान्यता आहे. विरोधकांच्या पोटात दुखते. त्यांना त्रास होतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन मोदींना म्हणातात, तुम्ही चांगली लोकशाही
राबवत आहात.

म्हणून उद्धवना मुंबईकरांनी नाकारले
१९९७ साली उद्धवजींची शिवसेना लढली, १०३ नगरसेवक होते. ९७ ते २००२ या काळात हा आकडा ९७वर आला. त्यानंतर ते ८४ वर आले. २०१२मध्ये तर ही संख्या ७५वर आली. २०१७मध्ये ८४ हा आकडा आला. ते आमच्या सरकारचे भाग होते म्हणून झाले. त्या फायद्यावर ८४ चा आकडा गाठला. राज्यात सरकारमध्ये नसते तर त्याच वेळेला हा आकडा ६०वर आला असता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -