Saturday, October 25, 2025
Happy Diwali

अजित पवारांवर आता पृथ्वीराज चव्हाण यांचाही पलटवार, म्हणाले...

अजित पवारांवर आता पृथ्वीराज चव्हाण यांचाही पलटवार, म्हणाले...

सोलापूर: महाविकास आघाडीमध्ये सारं आलबेल नाही हे वारंवार होणाऱ्या वादांवरुन सतत समोर येत आहे. यात अजित पवारांच्या महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ या विधानानंतर त्याचे पडसाद उमटले आहेत. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सद्यस्थिती पाहता महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. काँग्रेस दोन नंबर, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना तीन नंबरला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे विधान करण्यात चुकीचे काही नाही. परंतु, अशा वक्तव्यांना फारसे महत्त्व नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांत उत्साह वाढवण्यासाठी अशी वक्तव्य करण्यात येतात, असा खोचक टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.

दरम्यान, नाना पटोले यांनी आम्ही नेहमी मोठे होतो मात्र आम्ही कधीही त्याचा गर्व केला नाही, असं म्हणतं त्यावर कालच पलटवार केला होता. वाचा सविस्तर बातमी....

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा