Wednesday, April 30, 2025

देशताज्या घडामोडी

आता शिक्षकांसाठीही ड्रेस कोड!

आता शिक्षकांसाठीही ड्रेस कोड!

राज्य सरकारने जारी केली नियमावली

आसाम : काही शिक्षक आणि शिक्षिकांनी वस्त्र परिधान करण्याचे तारतम्य सोडल्याने अशा शिक्षक-शिक्षिकांना ताळ्यावर आणण्यासाठी अखेर राज्य सरकारने आता ड्रेस कोडची नियमावली जारी केली आहे.

तुम्ही एक स्त्री आहात आणि शिक्षिका आहात. त्यामुळे तुम्ही शिकवण्यासाठी जीन्स किंवा लेगिंग घालून शाळेत जाऊ शकत नाही. आसामच्या शिक्षण विभागाने असा आदेश काढला आहे. राज्याचे शिक्षण मंत्री रनोज पेगू यांनी ट्विट करून हा ड्रेस कोड जारी केला आहे.

काही शिक्षक आणि शिक्षिका त्यांच्या इच्छेनुसार कपडे घालून शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्याची सवय लागल्याचे दिसून आले आहे. याचा शालेय विद्यार्थ्यांवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. असे कपडे सामान्यतः लोकांमध्ये स्वीकार्य नसतात. विशेषत: जेव्हा तो शिक्षणासारखे आपले कर्तव्य बजावत असतो तेव्हा शिक्षकाने संपूर्ण सभ्यतेचे उदाहरण मांडावे अशी अपेक्षा असते. म्हणूनच सन्मान, शालीनता आणि गांभीर्य दर्शवणारा ड्रेस कोड असणे आवश्यक झाले आहे.

विहित ड्रेस कोडनुसार पुरुष शिक्षकांनी केवळ औपचारिक पोशाख परिधान करावा. फक्त शर्ट-पँट स्वीकार्य असेल. शिक्षकांनी स्वच्छ व सभ्य रंगाचे कपडे परिधान करावेत. चमकदार नाही. कॅज्युअल आणि पार्टी पोशाख घालणे पूर्णपणे टाळा. महिला शिक्षिकांनी सलवार सूट/साडी/मेखेला-चादर परिधान केले पाहिजेत, असे राज्य सरकारने काढलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे.

प्रत्येकाने या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल, असे सूचनेच्या शेवटच्या ओळीत लिहिले आहे. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा या नोटिफिकेशनमध्ये दिला आहे.

Comments
Add Comment