Wednesday, April 30, 2025

क्रीडाIPL 2025

गुजरातची आरसीबीवर ६ विकेटसनी मात

गुजरातची आरसीबीवर ६ विकेटसनी मात

बंगळुरू (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील अखेरच्या साखळी सामन्यात रविवारी गुजरातने आरसीबीने दिलेले १९८ धावांचे आव्हान सहज पार केले. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेल्या गुजरातच्या शुभमन गिल याने नाबाद १०४ धवांची झंझावाती खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. जिंकणे अशक्य वाटणारा हा सामना गुजरातने ६ विकेटस राखून जिंकला.विराट कोहलीचे शतक यावेळी व्यर्थ ठरले. कारण शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने आरसीबीचा पराभव केला. त्यामुळे आरसीबीचा संघ स्पर्धेच्या बाहेर गेला आहे आणि मुंबई इंडियन्सचा संघ प्ले ऑफमध्ये दाखल झाला आहे.

हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीचा संघ घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पावसामुळे सामना अर्धा तास उशीराने सुरु झाला. पावसामुळे मैदान संथ झालेले असल्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला अडचणी येण्याची शक्यता वाटत होती. पांड्याचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय सार्थ ठरला. बंगळुरूच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने दमदार सुरुवात केली. विराट कोहली आणि सलामी फलंदाज फाप डु प्लेसिस यांनी वादळी सुरुवात केली. दोघांनी ६७ धावांची सलामी दिली. नूर अहमद याने फाफला बाद करत ही जोडी फोडली. फाफ डु प्लेसिस याने १९चेंडूत २८ धावांची खेळी केली.

Comments
Add Comment