Tuesday, July 23, 2024
Homeक्रीडाIPL 2024मुंबईकडून गिल आणि ग्रीनने चांगली फलंदाजी केली

मुंबईकडून गिल आणि ग्रीनने चांगली फलंदाजी केली

सचिनचे भन्नाट ट्विट

नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सकडून शुभमन गिल आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी चांगली फलंदाजी केली. विराट कोहलीने उत्कृष्ट खेळी करत बॅक टू बॅक सेंच्युरी झळकावली, असा कौतुकाचा वर्षाव मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने केला. मुंबईने प्ले ऑफमध्ये प्रवेश केल्यानंतर सचिनने ट्विट करत आनंद व्यक्त केला. सचिन पुढे म्हणाला की, प्ले ऑफमध्ये मुंबई इंडियन्सला पाहणे खूप छान आहे.

शुभमन गिलच्या जबरदस्त शतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने आरसीबीचा ६ गडी राखून पराभव केला. त्यामुळे मुंबई इंडियन्स प्ले ऑफसाठी पात्र ठरली. शुभमन गिलने केवळ ५२ चेंडूंत ५ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने केलेल्या १०४ धावांच्या खेळीने संघाला सहज विजय मिळवून दिला आणि आरसीबीचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले.

या सामन्यानंतर सचिन तेंडुलकरने एका ट्विटमध्ये कॅमेरॉन ग्रीनच्या खेळीचे कौतुक केले, ज्याने मुंबई इंडियन्सला सामना जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. याशिवाय दुसऱ्या सामन्यातील शुभमन गिल आणि विराट कोहलीच्या शतकी खेळीचेही त्याने कौतुक केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -