Friday, August 29, 2025

चुकीच्या उपचारामुळे अठरा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

चुकीच्या उपचारामुळे अठरा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

चुकीच्या इंजेक्शनमुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

नांदेड : नांदेडमधील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान एका अठरा वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. मुलीच्या नातेवाईकांनी डॉक्टरांनी दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे हा मृत्यू ओढवला, असा आरोप केला आहे. जोपर्यंत संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. मुलीच्या मृत्यूला ३ दिवस उलटले तरीही नातेवाईकांनी या कारणास्तव मृतदेह ताब्यात घेतलेला नाही.

मृत तरुणी अठरा वर्षीय विद्यार्थिनी होती. १८ मे ला तिला चक्कर आल्यामुळे शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान काही वेळातच तिचा मृत्यू झाला.

दरम्यान गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईक आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी जिल्हाधिका-यांकडे दाद मागितली. "नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार संबंधित डॉक्टर व स्टाफकडून जो निष्काळजीपणा झाला असेल त्यावर समिती स्थापन करुन कोणी दोषी आढळल्यास त्यावर निश्चित योग्य ती कारवाई केली जाईल", असं जिल्हाधिकारी म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा