
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज, मुंबईतील ईडी कार्यालयात ११ वाजता चौकशीसाठी हजर राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाच्या चारही बाजूच्या रस्त्यांवर पोलिसांकडून बॅरीकेटिंग करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. तसेच ईडी आणि केंद्र सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांकडून घोषणा देण्यात येत आहेत.
सांगलीसह इस्लामपूर भागातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मुंबईत आले आहेत. तिकडे सांगली, पुणे आणि नाशिकमध्ये राष्ट्रावादीचे कार्यकर्ते रस्त्यावर आंदोलन करणार आहेत. राज्यभरातील कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्यास सुरूवात झाली आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांना ईडीने आयएल आणि एफएलएस प्रकरणी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार केला गेला असल्याचा जयंत पाटील यांच्यावर आरोप आहे. या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.