नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लंडनमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात भारतीय संघ नव्या जर्सीमध्ये मैदानात उतरणार आहे. तसेच भारतीय क्रिकेट संघाचा नवीन किट प्रायोजक आदिदास असेल. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मला कळवताना अतिशय आनंद होत आहे की बीसीसीआयने किट प्रायोजक म्हणून आदिदास कंपनीशी करार केला आहे. क्रिकेटचा खेळ पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जगातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्सवेअर कंपनीसोबत करार केल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे.
आयपीएलनंतर भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना ७ ते ११ जून दरम्यान लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापासून भारतीय संघ नव्या जर्सीमध्ये मैदानात खेळताना दिसणार आहे.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…