Wednesday, July 24, 2024
Homeसाप्ताहिककोलाज‘केके’ जोडीचा लवकरच जलवा

‘केके’ जोडीचा लवकरच जलवा

  • ऐकलंत का!: दीपक परब

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांची जोडी प्रेक्षकांना पुन्हा रूपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे. ‘भूल भुलैया-२’ या चित्रपटानंतर नंतर आता कार्तिक आणि कियारा या जोडीचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमध्ये कार्तिक आणि कियारा यांचा रोमँटिक अंदाज बघायला मिळत आहे.

या चित्रपटाचा टीझर कियारा अडवाणीने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘बाते जो कभी पूरी ना हों, वादे जो अधूरे हों, हंसी जो कभी कम ना हो. आंखें जो कभी नम ना हो और अगर हो तो बस इतना जरूर हो, आंसू उसके पर आंखे मेरी नम हो’ या कार्तिक आर्यनच्या डायलॉगने ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. कियाराने हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला असून या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

कार्तिकचा काही दिवसांपूर्वी ‘शेहजादा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केलेली नाही. तर कियाराचा ‘जुग जुग जियो’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. आता कार्तिक आणि कियारा यांच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाला प्रेक्षकांची कतपत पसंती मिळते हे लवकरच कळेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -