नवी दिल्ली (वृत्तसंस्था): पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी रविवारी पापुआ न्यू गिनीमध्ये पोहोचले. फिपिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पीएम मोदी पापुआ न्यू गिनीमध्ये दाखल होताच त्यांचे पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चरणस्पर्श करून स्वागत केले. याची जगभर चर्चा आहे. विशेष म्हणजे या इंडो पॅसिफिक प्रदेशाला भारतीय पंतप्रधानांनी दिलेली ही पहिलीच भेट आहे.
पापुआ न्यू गिनी हा हिंद प्रशांत महासागरात स्थित एक बेट आहे आणि त्याच्या स्थानामुळे हिंद पॅसिफिक महासागराच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा दौरा खूप महत्वाचा आहे.पापुआ न्यू गिनी सरकारने आपली परंपरा मोडत पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. कारण या देशात असा नियम आहे की, सूर्यास्तानंतर तेथे आलेल्या कोणत्याही नेत्याचे औपचारिक स्वागत केले जात नाही. मात्र पंतप्रधान मोदींचे आगमन होताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
पापुआ न्यू गिनी येथील मोरेस्बी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान मोदींचे पारंपारिक पद्धतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने अनिवासी भारतीयही उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या २२ मे रोजी पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांसोबत भारत-पॅसिफिक द्वीपसमूह सहकार्यासाठी तिसऱ्या फिपिक शिखर परिषदेत सहभागी होतील. फिपिकची स्थापना २०१४ मध्ये पंतप्रधान मोदींच्या फिजी दौऱ्या दरम्यान झाली होती. नरेंद्र मोदी यांच्या आधी कोणतेही भारतीय पंतप्रधान पापुआ न्यू गिनीला गेले नव्हते. या देशाला भेट देणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. पापुआ न्यू गिनीला जाण्यापूर्वी मोदी जपान दौऱ्यावर गेले होते. हिरोशिमा येथे आयोजित जी-७ शिखर परिषदेत ते सहभागी झाले होते. तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. येथे ते फिपिक शिखर परिषदेत एकूण १४ देशांचे नेते सहभागी होणार आहेत.
पंतप्रधानांचा हा दौरा खूप महत्वाचा आहे कारण पापुआ न्यू गिनी हा हिंद प्रशांत महासागरात स्थित एक बेट आहे आणि त्याच्या स्थानामुळे हिंद पॅसिफिक महासागराच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा दौरा खूप महत्वाचा आहे. पंतप्रधानांनी त्यांना मिठी मारून शुभेच्छा स्वीकारल्या. येथे ते फिपिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत.