Saturday, July 20, 2024
Homeमहामुंबईदोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी आयडी नको

दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी आयडी नको

स्टेट बँक ऑफ इंडियाने केले स्पष्ट

नागरिकांनी गोंधळून न जाण्याचे बँकांचे आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था ): दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही फॉर्मची किंवा कोणत्याही ओळख प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे एसबीआयने स्पष्ट केल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा वाटत आहे. एसबीआयकडून आपल्या सर्व मंडळांच्या मुख्य कार्यालयांना पाठवलेल्या पत्रात ही बाब नमूद केल्याने आता स्टेट बॅंकेसोबत इतर बँका देखील या नियमाचे पालन करतील अशी माहिती मिळत आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबरनंतर २००० च्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. नक्की कशा प्रकारे या नोटा बँकेत जमा करायच्या हा देखील संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. तसेच या संदर्भातली नियमावली वेळोवेळी बँकांकडून देखील जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी गोंधळून न जाण्याचे आवाहन बँकांकडून करण्यात येत आहे. तसेच दोव हजारांच्या नोटा बदलून देताना एक फॉर्म जारी करत माहिती भरुन द्यावी लागणार अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र या पत्रानंतर यावर आता स्पष्टीकरण मिळाले आहे.

मंगळवारपासून बदलता येणार नोटा

भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला. आरबीआयने बाजारातून २०००रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला असून ३० सप्टेंबर २०२३ पर्यंतच नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. २०१८-१९मध्येच २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. नागरिकांना २००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारपासून दोन हजारांच्या नोटा नागरिकांना बँकेत जाऊन बदलता येणार आहेत. एकावेळी फक्त २ हजार रुपयांच्या नोटा २० हजार रुपयांपर्यंत बदलू शकता. यासाठी बँकांना विशेष खिडकी उघडावी लागणार आहे. त्यामुळे तयारीसाठी आरबीयकडून बँकांना विशेष अवधी देखील देण्यात आला आहे.

आरबीआयने नागरिकांना उपलब्ध करुन दिलेले पर्याय

१. ज्यांच्याकडे २०००रुपयांच्या नोटा आहेत, ते नागरिक २००० रुपयांच्या नोटा बँक खात्यात जमा करू शकतात किंवा बँकेच्या शाखेत जाऊन इतर नोटांद्वारे बदलू शकतात.
२. बँकांमध्ये २००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्याबाबत कोणतेही निर्बंध नाहीत. बँकांना याबाबत स्वतंत्रपणे नियम जारी करण्यात येणार आहे.
३. २३ मे २०२३ पासून २००० रुपयांच्या नोटा २० हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत बदलता येतील.
४. ज्यांच्याकडे २०००रुपयांच्या नोटा आहेत ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० रुपयांची नोट बदलू शकतात. आरबीआयने यासंदर्भात बँकांना स्वतंत्रपणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
५. २३ मे २०२३ पासून, आरबीआयच्या १९ प्रादेशिक कार्यालयांमध्ये २० हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत, २००० रुपयांच्या नोटांची देवाणघेवाण करता येईल.
६. आरबीआयने बँकांना २००० रुपयांच्या नोटा तात्काळ जारी करू नयेत असे सांगितले आहे.
७. आयबीआयने सर्वसामान्य लोकांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० रुपयांची नोट बदलून घेण्यासाठी किंवा बँकेत जमा करण्यासाठीची मुदत दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -