‘छोटे उस्ताद’ पुन्हा भेटीला...



  • ऐकलंत का!: दीपक परब



मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद २’ या गाण्याच्या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. छोट्या पडद्यावरील ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता या कार्यक्रमाचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या गाण्याच्या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.


'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद २' या गाण्याच्या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये ‘तू चाल पुढं... हे गाणं १० वर्षांचा संकल्प काळे गाताना दिसत आहे. संकल्प हा जालनाचा आहे. प्रोमोमध्ये पुढे, संकल्प हा सचिन पिळगावकर, आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत यांच्यासमोर गात असल्याचे दिसत आहे. त्यानंतर सचिन पिळगावकर, आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत हे ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद’बाबत घोषणा करताना दिसतात. हा कार्यक्रम १० जूनपासून शनिवार ते रविवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता या कार्यक्रमात कोण-कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत? या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोण करणार आहे? या प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत. या कार्यक्रमाचा प्रोमो पाहिल्यानंतर लक्षात येते की, सचिन पिळगावकर, आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत हे या कार्यक्रमाचे परीक्षक आहेत.


‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद’ या कार्यक्रमाची शुद्धी कदम ही विजेती ठरली होती. या कार्यक्रमात राजयोग धुरी, सार्थक शिंदे, सिद्धांत मोदी, राधिका पवार आणि सायली ठक या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धकांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या कार्यक्रमात विविध कलाकारांनी हजेरी लावली होती. आता या ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद-२’ या कार्यक्रमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Comments
Add Comment

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं