
न्यूयॉर्क (वृत्तसंस्था): अमेरिका पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरली आहे. उत्तर मेक्सिकोमधील बाजा कॅलिफोर्नियामध्ये काल एका रेसिंग शो दरम्यान हा गोळीबार झाला. या गोळीबारात १० जण ठार झाले तर ९ जण जखमी झाले आहेत.
याबाबत, सविस्तर वृत्त असे की एन्सेनाडा शहरातील सॅन व्हिसेंट भागात ऑल-टेरेन कार रेसिंग शो सुरु होता. याचदरम्यान, एका व्हॅनमध्ये आलेल्या हल्लेखोरांनी अचानक गोळीबार सुरु केला. अंदाधुंद गोळीबार झाल्यानंतर नागरिकांची एकच धांदल उडाली.
या घटनेची माहिती समजताच पोलिस प्रशासन, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळीबाराच्या घटनेनंतर या भागात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच हा परिसर अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी ओळखला जातो. दरम्यान, गोळीबारात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.