Thursday, November 7, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकशिर्डी संस्थानचे साईभक्तांसाठी सबुरीचे धोरण

शिर्डी संस्थानचे साईभक्तांसाठी सबुरीचे धोरण

दानपेटीत ३० सप्टेंबरपर्यंतच टाका दोन हजारांच्या नोटा ; त्यानंतर नको…

नाशिक (प्रतिनिधी): रिझर्व्ह बँकेच्या दोन हजारांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयानंतर, असंख्य भाविकांची श्रद्धा असलेल्या साईबाबांच्या शिर्डी संस्थानने सबुरीचl धोरण अवलंबलl आहे. ३० सप्टेंबरनंतर दोन हजारांच्या नोटा दानपेटीत टाकू नका असे आवाहन आतापासूनच शिर्डी संस्थानच्या वतीने भाविकांना करण्यात येत आहे. साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी सिवा शंकर यांनी हे आवाहन केले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत साईंच्या दानपेटीत दोन हजारांच्या नोटा स्वीकारण्यात येतील. मागील नोटबंदीच्या काळातील नोटा अद्याप पडून असल्याने साई संस्थानने हा निर्णय घेतला असल्यांचे सांगितले जात आहे. शिर्डी संस्थानात दररोज लाखो रुपयांचे दान येत असते. भाविक मोठ्या प्रमाणात शिर्डी संस्थानात दान करत असतात. त्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर शिर्डी संस्थानकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

मोदी सरकारने ५०० आणि १००० च्या नोटा बंद केल्यानंतर शिर्डी संस्थानमध्ये या नोटा भाविकांनी दान केल्या होत्या. अनेक भक्तांनी दानपेटीत या नोटा टाकल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिर्डी संस्थानच्या दानपेटीत या नोटा जमा झाल्या होत्या. नोटबंदीच्या काळात जवळपास ३ कोटी रुपयांच्या नोटा साईंच्या दानपेटीत जमा झाल्या होत्या. या नोटा आजही तशाच पडून आहेत. त्यामुळे पुन्हा तशी वेळ येऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे शिर्डी संस्थानकडून सांगितले जात आहे.

गुलाबी नोटांचा प्रवास संपणार…

रिझर्व्ह बँकेने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार ३० सप्टेंबरनंतर २००० च्या नोटा चलनातून बाद होणार आहेत. या नोटा नंतर कायदेशीर अवैध असणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. तसेच या गुलाबी नोटांनी केवळ साडे सहा वर्षांचा प्रवास केला असून आता या नोटा रद्द करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. सुरुवातीला मोठ्या प्रमाणात या नोटा चलनात होत्या. त्यावेळी त्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जात होता. परंतु कोरोनाच्या काळानंतर अर्थव्यवस्था पुन्हा जम बसवत होती. परंतु त्यावेळेस दोन हजाराच्या नोटा मात्र गायब होऊ लागल्या होत्या. तसेच मागील तीन वर्षांपासून एकही दोन हजारांची नोट छापण्यात आलेली नाही. सर्वसामान्य लोकांना मात्र या नोटांचा बऱ्यापैकी त्रास व्हायचा, कारण ५०० नंतर थेट २००० च्या नोटा चलनात होत्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -