प्राथमिक तयारीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण
मालवण : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणा-या नौसेना दिनाच्या कार्यक्रमाच्या तयारीचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधल्या आरमाराचे प्रमुख केंद्र म्हणून मान्यता असणाऱ्या ऐतिहासिक व अभेद्य सिंधुदुर्ग किल्ल्याजवळील अरबी समुद्रात येत्या ४ डिसेंबरला ‘भारतीय नौसेना दिन’ साजरा होणार आहे. त्या अनुषंगाने प्राथमिक तयारीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा वेस्टर्न नेव्हल कमांड फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ दिनेश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत पार पडला.
भारतीय आरमाराचे जनक शिवाजी महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी यंदाचा नौसेना दिन हा सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ७० लढाऊ जहाजे सहभागी होणार आहेत.