Thursday, July 18, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरडहाणूत आठ ग्रामपंचायतींवर कमळ फुलले; मोखाड्यात शिंदे गटाचे वर्चस्व

डहाणूत आठ ग्रामपंचायतींवर कमळ फुलले; मोखाड्यात शिंदे गटाचे वर्चस्व

पोटनिवडणुकीत महिलाराज

डहाणू (प्रतिनिधी) : डहाणू तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीमधील, नऊ प्रभागात काल झालेल्या मतदानाची मतमोजणी आज पूर्ण झाली. जरी पक्ष चिन्हावर ही पोट निवडणूक झाली नसली तरी, या पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये बहुतेक ग्रामपंचायतीवर डहाणूचे माजी नगराध्यक्ष भरतसिंग राजपूत यांनी दिलेल्या योगदानामुळे भाजपचे उमेदवार निवडून आले. तर मोखाडयातील चित्र काहीसे वेगळे आहे. राज्यात भाजप शिंदे गट एकत्र असला तरी देखील, या ठिकाणी शिंदे गटाचे वर्चस्व दिसून आले.

१९ मे रोजी डहाणूच्या सेंट मेरीज हायस्कूलमध्येआठ ग्रामपंचायतीमधील नऊ प्रभागात झालेल्या पोटनिवडणूक मतमोजणीत निवडून आलेल्या सर्व महिला ह्या अनुसूचित जमातीच्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी विजयी उमेदवारांची नावे
घोषित केली.

तत्पूर्वी दहाळे ग्रामपंचायतीचे उमेदवार प्रतिभा विष्णू बसवत आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार, अमिता जयदेव रावते यांना,समान प्रत्येकी ८३ मते पडल्याने लॉटरी पद्धतीने चिठ्ठी टाकून प्रतिभा विष्णू बसवत यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. तर मोखाडयात स्थानिक पातळीवर मात्र मतभेद दिसून आले. तालुक्यातील काष्टी सावर्डे या आजवर भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकीत थेट सरपंच पदाच्या शर्यतीत बाजी मारत भाजपाला धोबीपछाड केले होते. याचाच वचपा काढण्यासाठी काल झालेली पोटनिवडणुक तालुका भाजपाने प्रतिष्ठेचे केली होती. मात्र या पोटनिवडणुकीतही शिवसेना (शिंदे गट)यांनी बाजी मारत सुनीता अंकुश बोटे या विजयी झालेल्या आहेत. काल झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतदानात तालुक्यातील काष्टी सावर्डे या ग्रामपंचायतमधील या एका जागेला ज्या पद्धतीने भाजपने प्रतिष्ठेचे केले होते त्यामुळे या जागेला विशेष महत्व प्राप्त होवून संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निवडणूकीकडे लागले होते. या मतदार संघात भाजपचे प्राबल्य हाेते.

तलासरीत ‘माकपा’ ची बाजी

तलासरी तालुक्यातील ग्रामपंचायत वसा आणि ग्रामपंचायत डोंगारीच्या पोट निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तिन्ही जागा जिंकून भाजपाला पराभूत केले. तालुक्यातील डोंगारी ग्रामपंचायतच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक लागली. पण माकपच्या सुवर्णा संदीप बोबा यांच्या विरोधात कोणीही अर्ज दाखल न केल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या.

ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवार :-

  • आसनगाव- भूमिका भुवनेश गोलिम
  • कैनाड- तेजस्विनी तारेश उंबरसाडा
  • चरीकोटबी- निर्मला कमलेश वाघात
  • जामशेत -संगीता वसंत गोरवाला
  • दह्याळे- प्रतिभा विष्णू बसवत
  • मुरबाड- सोनाली दिनकर सापटा
  • निकणे- जयश्री प्रकाश चव्हाण (प्रभाग दोन)
  • निकणे – सुंदर रमेश रसाळ (प्रभाग तीन)
  • हळद पाडा- कल्पना संपत दांडेकर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -