मुरूड : शासकिय योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन आपल्या दारी उपक्रम राबविला जात आहे. याचाच भाग मुरुड तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन शासकिय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार रोहन शिंदे यांनी केले असल्याने, याचाच भाग मुरुड तालुक्यातील काशिद ग्रामपंचायतीत शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्यात आला.
यामध्ये शासकिय योजना, नवीन मतदार नोंदणी, संजय गांधी योजना लाभ संबंधीत, उत्पन्न दाखले, दुय्यम शिधा पत्रिका, जन्म मृत्यू दाखले, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, विविध आवास योजनांची माहिती व लाभार्थी, कृषी विभागाच्या विविध लाभांची माहिती देणे, आ. भा. कार्डाची नोंदणी, ई श्रम कार्डाची नोंदणी, आधारकार्ड नोंदणी, पी. एम. किसन योजना ई-के. वाय. सी अपडेशन इ. चा समावेश आहे.शासन आपल्या दारी उपक्रमाचा ग्रामपंचायत हद्दीतील काशिद चिकणी व सर्वे गावातील लोकांना लाभ व मार्गदर्शन लाभले.
ग्रामपंचायत सरपंच नम्रता कासार-खेडेकर, उपसरपंच वर्षा विलास दिवेकर,अमित खेडेकर, विलास दिवेकर,तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागाचे अव्वल कारकून सचिन राजे, तलाठी अरविंद देशमुख, ग्रामसेवक सुशांत ठाकूर कर्मचारी उपस्थित होते.