वाशिम : हळदीला योग्य भाव मिळत नसल्याने वाशिम बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाले. शेतकर्यांनी बाजार समितीतच घोषणाबाजी सुरु केली आणि या घोषणाबाजीदरम्यान शेतकर्यांनी हळद खरेदी बंद पाडली.
वाशिम बाजार समितीत आठवड्यातून एकच दिवस शनिवारी हळद खरेदी विक्रीचा व्यवहार चालतो. मात्र या व्यवहारात हळदीचे भाव कमी करुन व्यापारी हळद खरेदी करत असल्याचा आरोप करत शेतकरी रस्त्यावर उतरले होते. अकोला – हैदराबाद रस्त्यावर शेतकर्यांनी ठिय्या मांडला.
वास्तविक हळदीला ७,५०० ते ८,५०० रुपये इतका भाव मिळतो. मात्र खरेदीदार केवळ ४,५०० ते ६,५०० चा भाव लावत होते. त्यामुळे हळदीचे भाव कमी करुन व्यापारी हळद खरेदी करत आहेत, अशी शेतकर्यांची धारणा झाली. हळदीला योग्य भाव द्या अन्यथा हळद खरेदी होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकर्यांनी घेतला आहे.