राजस्थानचे भवितव्य आज ठरणार?

Share

पंजाबला लोळवण्याचे लक्ष्य

  • वेळ : सायंकाळी ७.३० वा
  • ठिकाण : हिमाचल प्रदेश क्रिकेट असो. (एचपीसीए) स्टेडियम, धर्मशाला

धर्मशाला (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या प्ले ऑफ प्रवेशाची लढत निर्णायक टप्प्यावर पोहचली आहे. त्यामुळे अंतिम चारमध्ये प्रवेश करण्यासाठी संघांमध्ये चांगलीच चुरस रंगत आहे. पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ शुक्रवारी आमनेसामने येणार आहेत. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांना विजय अनिवार्य आहे. त्यानंतरही अन्य संघांच्या गणितावर विजेत्या संघाचे भवितव्य अवलंबून असेल. पराभूत होणारा संघ थेट स्पर्धेबाहेर फेकला जाणार आहे.

शुक्रवारी धर्मशालाच्या मैदानावर पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स दुसऱ्यांदा आमने-सामने येणार आहेत. यापूर्वीच्या सामन्यात घरच्या मैदानावर राजस्थानला हरवत पंजाबने विजय मिळवला होता. संपूर्ण हंगामात कामगिरीत चढ-उतार असूनही पंजाबच्या तुलनेत रॉयल्सचा निव्वळ रनरेट चांगला आहे. हा सामना जिंकूनही, दोन्ही संघांना त्यांचे प्लेऑफचे भवितव्य निश्चित करण्यासाठी इतर सामन्यांच्या निकालांवर देखील अवलंबून राहावे लागेल.

पंजाब किंग्जला हंगामात आपल्या क्षमतांचा फायदा घेता आलेला नाही. गोलंदाजीत वेगवान विभागाने पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये खूप धावा दिल्याचा फटका संघाला बसला आहे. कागिसो रबाडा, सॅम करन आणि अर्शदीप सिंग यांनी षटकामागे सरासरी १० धावा दिल्या आहेत. रबाडा सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसताना, गत सामन्यात पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये अर्शदीपचा वापर करणे अपेक्षित होते; परंतु तसे झाले नाही. अर्शदीपने डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर टाकून स्विंगने फलंदाजांना त्रास दिला आहे. अर्शदीप सिंगने पंजाबसाठी १३ सामन्यांत १६ विकेट घेतल्या आहेत. अशात जिंकणे आवश्यक असलेल्या या सामन्यात हरप्रीत ब्रार, अर्शदीप तसेच इतर गोलंदाजांकडूनही दमदार कामगिरीची अपेक्षा असेल.

फलंदाजीत धवनलाही गेल्या दोन सामन्यांत यश मिळू शकले नाही. दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर शिखरच्या फॉर्मला चांगलाच फटका बसला आहे. शिखर धवनने आयपीएल २०२३ मध्ये चांगली सुरुवात केली होती. त्याने पहिल्या चार सामन्यांमध्ये दोन अर्धशतके ठोकत १००च्या सरासरीने जवळपास २५० धावा केल्या होत्या. दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर त्याने केवळ १२३ धावा केल्या आहेत. सिकंदर रझा आणि गत सामन्याचा हिरो लियाम लिव्हिंगस्टन यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

दुसरीकडे आयपीएलच्या सुरुवातीला पहिल्या पाचपैकी चार सामन्यांत विजय मिळवून अव्वल स्थानी असलेला दावेदार राजस्थान रॉयल्सचा संघ आता मात्र अडचणीत सापडला आहे. यशस्वी जयस्वाल आणि युझवेंद्र चहल यांनी उत्कृष्ट कामगिरी करूनही संघ अपयशी ठरत आहे. जोस बटलरनेही सुरुवातीला काही सनसनाटी खेळी खेळत विजयात वाटा उचलला आहे. पण त्याच्यात सातत्य न राहिल्यामुळे राजस्थानच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे ‘करो या मरो’च्या या सामन्यात त्यांचे धावा करणे गरजेचे आहे. फलंदाजीत कर्णधार संजू सॅमसन कोणत्याही परिस्थितीत गोलंदाजांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. फलंदाजीची खोली असली तरी गत सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, आर अश्विन आणि युझवेंद्र चहल राजस्थानसाठी दमदार कामगिरी करत आहेत.

अलिकडच्या काळात राजस्थानच्या खराब कामगिरीचे मुख्य कारण म्हणजे त्यांची पॉवर प्लेमधील गोलंदाजी हे आहे. ज्या सामन्यांमध्ये त्यांनी पॉवरप्लेमध्ये विकेट घेतली नाही तेथे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. राजस्थानचे आघाडीचे तीन फलंदाज जोस बटलर, यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन यांनी या हंगामात संघाच्या ६३ टक्के धावा केल्या आहेत. पण त्यानंतर फलंदाजांकडून फक्त दोनच अर्धशतके झाली आहेत. तसेच लक्ष्याचा पाठलाग करण्यात राजस्थानचे फलंदाज मागे पडले.

Recent Posts

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, एक ठार तर अनेकजण गंभीर जखमी

पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…

1 hour ago

मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा; राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना होणार फायदा

ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…

1 hour ago

फडणवीस सांगतील तसं चालणार! थोपटेंनंतर तांबेही भाजपाच्या दिशेने?

पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…

1 hour ago

Sangram Thopte : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसच्या माजी आमदारांनी हाती घेतले ‘कमळ’

पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…

2 hours ago

Tiger Shroff: टायगर श्रॉफला जीवे मारण्याची धमकी! खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीला पंजाबमधून अटक

मुंबई: टायगर श्रॉफला (Tiger Shroff) जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल, मुंबई पोलिसांनी पंजाबमधील…

2 hours ago

Nitesh Rane : राज्य सरकारचा मत्स्य व्यवसायाबाबत गेमचेंजर निर्णय!

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…

2 hours ago