Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणनमन, जाखडी लोककलांना मिळणार राजाश्रय

नमन, जाखडी लोककलांना मिळणार राजाश्रय

आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश

चिपळूण (प्रतिनिधी) : आमदार शेखर निकम यांनी कोकणातील नमन व जाखडी या लोककलांना राजाश्रय मिळावा, यासाठी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला होता. या पार्श्वभूमीवर आता नमन, जाखडी लोककलांना राजाश्रय मिळण्याची शक्यता आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यात गांभीर्याने लक्ष घतले असून लवकर याबाबत बैठक घेऊन हा महत्त्वाचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

कोकणातील दशावतार वगळता नमन, जाखडी अशा महत्त्वाच्या लोककलांना राजाश्रय नाही. यामुळे नमन, जाखडी अशी अनेक मंडळे आज लोकांचे मनोरंजन करीत असताना, कोकणातील या लोककला अनेक कलाकार जपत असताना त्यांची अडचण होत आहे. नमन, जाखडी मंडळांना अनुदान मिळत नाही, कलाकारांना कसल्याही प्रकारच्या सुविधा अथवा मानधन मिळत नाही. या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी चिपळूण येथे झालेल्या लोककला महोत्सवात नमन, जाखडी या लोककलांना राजाश्रय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने हा कोकणच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय पावसाळी अधिवेशनात मांडला. त्याला आता मूर्त रूप येण्याची चिन्हे दिसत आहेत.

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी आ. शेखर निकम यांना १५ मे रोजीच्या पत्राने या विषायासंदर्भात उत्तर दिले आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव यांच्याकडे आपण हा विषय कार्यवाहीसाठी पाठविल्याचे मुनगंटीवार यांनी कळविले आहे. तसेच या संदर्भात लवकरच मंत्रालयात बैठक घेण्याचे जाहीर केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -