आम्ही चाललो आमच्या गावा: अखेर नाशिकहून राजस्थानला उंट रवाना

२५ दिवसांच्या प्रवासानंतर पोहोचणार राजस्थानला


नवीन नाशिक (प्रतिनिधी) : पांजरपोळच्या आश्रयाला असलेल्या १११ पैकी बारा उंटांचा मृत्यू झाला असून केवळ ९९ उंट आता या ठिकाणी उरले होते. राजस्थानला या उंटाना घेऊन जाण्यासाठी गुरूवारी रायका नाशिकमध्ये दाखल झाला होता. अखेरीस आज शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हे उंट पांजरपोळ येथून राजस्थानच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान, एक उंट प्रवेशद्वारावरच जखमी झाल्याने त्यास पांजरपोळ येथेच ठेवण्यात आले असून उर्वरित सर्व ९८ उंट हे राजस्थानकडे रवाना करण्यात आले आहेत. रोज वीस ते पंचवीस किलोमीटर प्रवास करुन तब्बल पंचवीस दिवसांनंतर हे उंट राजस्थानला पोहोचणार आहेत.


नाशिक येथे ४ मे रोजी तस्करीसाठी जात असलेल्या उंटांची माहिती प्राणिमित्रांना मिळाली होती. नंतर १११ उंटांना जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेऊन उंटांच्या संगोपनाची जबाबदारी पांजरपोळ संस्थेला दिली होती. मात्र, हजारो किलोमीटर लांबवरून पायपीट करून आल्याने व वातावरणातील बदल यामुळे अत्यावस्थ झाल्याने पैकी तब्बल १२ उंटांचा मृत्यू पांजरपोळ येथे झाला. त्यांच्या मृत्यूची संख्या लक्षात घेत प्राणी मित्रांसह पांजरपोळ संस्थेने हे उंट राजस्थानला पुन्हा घेऊन जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पत्र व्यवहार केला होता.


यानंतर राजस्थान येथील एका संस्थेने या उंटांच्या संगोपनाची जबाबदारी घेणार असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले. त्यानुसार राजस्थान येथून उंटांना सांभाळणारे सात रायका गुरुवारी पांजरपोळ येथे दाखल झाले होते. शुक्रवारी सकाळी पशु संवर्धन विभागाचे अधिकारी गिरीश पाटील, डॉ. वैशाली थोरात, डॉ. साखरे यांनी पांजरपोळ येथे भेट दिली. नंतर व्यवस्थापक विठ्ठल आगळे यांना पत्र मिळाले. जिल्हाधिकारी यांच्या कडील पत्र रायकांना दिल्या नंतर उंट राजस्थानकडे रवाना झाले. रायका हे उंट वणी मार्गे घेऊन जाणार आहेत. त्यात दररोज वीस ते पंचवीस किलो मीटर इतका प्रवास हे उंट करणार आहे. पंचवीस दिवसांत राजस्थान येथे उंट पोहोचणार असल्याची माहिती रायका यांनी दिली.दरम्यान, पांझरपोळ येथे या उंटाच्या संगोपनासाठी रोज ४० ते ५० हजार रुपये खर्च झाल्याची माहिती व्यवस्थापक विठ्ठल आगळे यांनी दिली.

Comments
Add Comment

Vegetable Price Hike : पावसाचा फटका! राज्यात भाजीपाल्याचे दर दुप्पट; सर्वसामान्यांच्या खिशाला बसली कात्री

मुंबई: राज्यात मागील काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले असून बाजारात आवक

Beed Cyber Crime : IT इंजिनिअरच ठरला सायबर क्राईमची शिकार; ‘SEBI’चे बनावट प्रमाणपत्र पाठवून IT इंजिनियरची लाखोंची फसवणूक

बीड : बीड जिल्ह्यात सायबर फसवणुकीची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तंत्रज्ञानाची चांगली माहिती असलेल्या

Chembur News: चेंबूर वृक्ष दुर्घटनेनंतर महापालिकेचा मोठा निर्णय; कंत्राटदारांना दंड, झाडांच्या सुरक्षेसाठी नवी SOP लागू होणार

चेंबूर (पश्चिम) येथील डायमंड गार्डनजवळ 30 जून 2026 रोजी शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी

Jalgaon Accident : संसाराची नवी स्वप्न धुळीस! लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच नवविवाहितेचा भीषण अपघातात मृत्यू

माहेरी जाताना २१ वर्षीय नवविवाहितेचा भीषण अपघातात मृत्यू जळगाव : जळगाव (Jalgaon) शहरात सोमवारी घडलेल्या भीषण अपघातात

Maldhok News : माळढोक अधिसूचित क्षेत्रात बिबट्याचे अवशेष आढळले; मृत्यूचे कारण शोधण्यासाठी वन विभागाचा तपास सुरू

अहमदनगर  : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोसेगव्हाण येथील माळढोक (Maldhok) अधिसूचित क्षेत्रात

ST Depot Redevelopment : एसटी डेपोंच्या जमिनी भाड्याने देणार

- ९८ वर्षांचे लीज मॉडेल; एसटीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी निर्णय मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन