Monday, July 8, 2024
Homeताज्या घडामोडीडॉ. विजया वाड यांना उज्जैनकर फाउंडेशनचा तापी- पूर्णा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार

डॉ. विजया वाड यांना उज्जैनकर फाउंडेशनचा तापी- पूर्णा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार

मुंबई (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. विजया वाड यांना उज्जैनकर फाउंडेशनचा तापी-पूर्णा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या हस्ते डॉ. विजया वाड यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय पहिले शिव, बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारी २०२२ रोजी आदिशक्ती संत मुक्ताईनगरीत मोठ्या थाटात संपन्न झाले. या प्रसंगी डॉ. विजया वाड यांना त्यांच्या तब्येतीमुळे उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे अंधेरी येथील त्यांच्या निवासस्थानी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी जाऊन त्यांना स्मृतिचिन्ह व मानपत्र आणि डॉ. उज्जैनकर यांनी संपादित केलेले प्रबोधनाची ज्ञानदिंडी हे पुस्तक भेट देऊन हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी प्रास्ताविकामध्ये फाउंडेशनच्या राज्य संघटक पूनम राणे यांनी प्रास्ताविक करून डॉ. विजया वाड यांच्या कार्याविषयी माहिती दिली. तर डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी फाउंडेशनचे कार्य विशद करून विजया वाड यांच्या कार्याचीसुद्धा उपस्थितांना माहिती दिली.

या प्रसंगी अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी फाउंडेशनचे कार्यकारी सदस्य प्रा. विनायक वाडेकर, राज्य संपर्कप्रमुख फर्जना डांगे, राज्य समन्वयक लता गुंठे, राज्य महिला संघटक पूनम राणे, ठाणे जिल्हा समन्वयक रमेश उज्जैनकर, जळगाव जिल्हा सल्लागार मनोहर रोकडे, बुलढाणा जिल्हा संघटक डॉ. निवृत्ती जाधव, आर्यन वाडेकर यांची विशेष उपस्थिती होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -