मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायलयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आज दाखल केलेल्या रिट याचिकेवर सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंर न्यायलयाने समॉर वानखेडे यांना २४ मेपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे. त्याचबरोबर समीर वानखेडे यांची याचिका २४ मे पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
तसेच न्यायालयाने सीबीआयला वानखेडे यांचा जबाब नोंदविण्याच्या सूचना दिल्या असून सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर वानखेडे यांनी सीबीआयला तपासात सहकार्य करावं, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.