नवी दिल्ली (वृत्तसंस्था): भारतीय रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या सर्वात मोठ्या चलनी नोटेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने, २ हजार रुपयांची नोट पर्यंत परत करण्यासाठी ३० सप्टेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. या नोटेची कायदेशीर निविदा राहील, परंतु ती चलनातून बाहेर काढली जाईल.
तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील बँकांना २ हजार रुपयांच्या नोटा जारी करणे तात्काळ थांबवण्याचा सल्ला दिला आहे. ‘क्लीन नोट पॉलिसी’ अंतर्गत रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. २०१६ मध्ये नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांची नोट जारी केली होती.